IPO Update:एनएसईत उद्यापासून गुंतवणूकदारांसाठी दोन एसएमई आयपीओ जाणून घ्या इत्यंभूत माहिती...

१६ ते २१ मे दरम्यान आयपीओ बाजारात गुंतवणूकीसाठी दाखल

    15-May-2024
Total Views |

IPO
 
 
मुंबई: उद्यापासून रुलका इलेक्ट्रिकल लिमिटेड व होक फूडस इंडिया लिमिटेड या दोन कंपन्यांचे एस एम ई प्रवर्गात आयपीओ बाजारात येत आहेत. गुंतवणूकदारांसाठी हे दोन्ही आयपीओ उद्यापासून म्हणजेच १६ मे ते २१ मे २०२४ पर्यंत गुंतवणूकीसाठी खुले असणार आहेत. जाणून घ्या याबाबत अधिक माहिती....
 
१) रुलका इलेक्ट्रिकल लिमिटेड - (Rulka Electricals Limited) - या एसएमई आयपीओ अंतर्गत या कंपनीचा आयपीओ उद्यापासून बाजारात दाखल होत आहे. कंपनी ८.४२ लाख शेअर्सचा फ्रेश इश्यू बाजारात आणणार आहे. १६ ते २१ मे यादरम्यान हा आयपीओ बाजारात खुला राहणार आहे. मे २२ पर्यंत आयपीओ निश्चित होण्याची शक्यता आहे. अंतिमतः हा आयपीओ एनएसई एसएमई या विभागात नोंदणीकृत होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीचा आयपीओ प्राईज बँड २२३ ते २३५ रुपये प्रति समभाग (Share) निश्चित करण्यात आला आहे. या समभागात एक गठ्ठा (Lot) ६०० समभागांचा असणार आहे.
 
या आयपीओसाठी गुंतवणूकदारांना कमीतकमी १४१००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. Beenline Capital Advisors Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Bigshare Services Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. मार्केट मेकर म्हणून Sunflower Broking कंपनी काम पाहील. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप २२ मे पर्यंत होण्याची शक्यता आहे. २३ मेपर्यंत अपात्र गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा परत मिळू शकतो. २४ मे पासून कंपनी एनएसई नोंदणीकृत होणार आहे.
 
या आयपीओत पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) आयपीओतील ५० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करता येईल. विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) १५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) रुपेश कासवकर व नितीन अहेर हे आहेत.
 
ही कंपनी २०१३ साली स्थापन झाली होती. इलेक्ट्रिकल व फायर फाईंटिंग सोलूशन कंपनी असून या कंपनीत विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक सेवा पुरवल्या जातात. ३१ मार्च, २०२३ पर्यंत कंपनीला २८०.५२ कोटींचा करोत्तर नफा झाला होता जो ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढत ५६५.७७ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीचा आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी व दैनंदिन कामकाजासाठी व इतर खर्चासाठी वापरला जाणार आहे.
 
२) होक (Hari Om Atta Spices) - हरी ओम आटा स्पाइस या कंपनीचा आयपीओ १६ मे २०२४ ते २१ मे २०२४ पर्यंत गुंतवणूकदारांसाठी असणार आहे. हरी ओम आटा एनएसई एसएमई या विभागात हा आयपीओ असणार आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने प्राईज बँड ४८ रुपये प्रति समभाग निश्चित केला आहे. एक गठ्ठा ३००० समभागांचा असणार आहे.
 
गुंतवणूकदारांना या आयपीओत कमीत कमी १४४००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. GYR Capital Advisors Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Kfin Technologies Limited कंपनी या आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. Giriraj Stock Broking ही कंपनी मार्केट मेकर म्हणून काम पाहणार आहे.
 
या आयपीओत २२ मे पर्यंत गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप होण्याची शक्यता आहे. अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २३ मे पर्यंत मिळू शकतो. कंपनी २४ मे रोजी एनएसई एसएमई अंतर्गत नोंदणीकृत होणार आहे. या आयपीओत एकूण गुंतवणूकीपैकी ५० टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे तर ५० टक्के वाटा इतर समुहासाठी उपलब्ध असणार आहे.
 
२०१८ साली ही कंपनी स्थापन झाली होती. ही कंपनी आटा, मसाला, व इतर अन्न उत्पादनात आहे. कंपनीचे कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue From Operations) ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ११४८.६९ लाख कोटी होते तर ३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनीच्या करोत्तर नफ्यात (११५.११%) ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढ झाली होती. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) १८.४५ कोटी आहे.
 
या आयपीओत उभारलेला निधी वर्किंग कॅपिटल गरजेसाठी व दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.