आयआयटी बॉम्बेमध्ये समाजशास्त्राचे हिंदुविरोधी प्राध्यापक!

    15-May-2024
Total Views |

IIT Bombay

मुंबई (प्रतिनिधी) :
पवईच्या आयआयटी बॉम्बेचा (IIT Bombay) हिंदुद्वेशी चेहरा पुन्हा एकदा समोर आल्याचे दिसते आहे. हिंदू धर्माचा अपमान करणारा प्रश्न पीएचडीच्या एका प्रश्नपत्रिकेत मांडल्याबद्दल आयआयटी बॉम्बेच्या मानवता आणि समाजशास्त्र विभागातील प्राध्यापकांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे. मंगळवार, दि. ७ मे रोजी समाजशास्त्राचा पेपर आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापकांकडून काढण्यात आला होता.

हे वाचलंत का? : श्रीरामललाचा प्रसाद जाणार थेट लंकेतील अशोक वाटीकेत!

'What does Antonio Gramsci mean by hegemony? Is Hindutva hegemony or counter-hegemony? Discuss.' असा प्रश्न मुलांना प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आला होता. याव्यतिरिक्त, परीक्षेत जाती आणि जातीय हिंसाचारावर लक्ष केंद्रित करणारा आणखी एक वादग्रस्त प्रश्नही समाविष्ट करण्यात आला होता. (Comment on the similarities between caste violence and communal violence.)


समाजशास्त्र प्रश्नपत्रिका सेट करण्यासाठी जबाबदार असलेल्या पॅनेलवर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित व्यक्तींनी आयआयटी बॉम्बे प्रशासनाला या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य तो दंड ठोठावण्याची विनंती केली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक अखंडता आणि शैक्षणिक संस्थांमध्ये निःपक्षपातीपणा राखण्याच्या महत्त्वाबाबत वादाला तोंड फुटले आहे.