पेटीएमचे युपीआय लाईट लाँच ' हे' आहेत फायदे

दिवसातून ४००० रुपये भरण्याची मुभा

    15-May-2024
Total Views |

Paytm Upi lite
 
मुंबई: One97 Communications कंपनीचे 'पेटीएम' ने ग्राहकांसाठी पेटीएम युपीआय लाईट लाँच केले आहे. ग्राहकांना सोयीस्कर व्यवहाराकरिता तसेच छोट्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी उपयुक्त म्हणून पेटीएम लाईट कंपनीने काढल्याचे म्हटले आहे. या मध्ये ग्राहकांना पिन टाकण्याची गरज नाही ग्राहक थेट व्यवहार करु शकतात. यामध्ये आवश्यक ती रक्कम ग्राहकांना लोड करून ठेवणे शक्य होणार आहे.
 
यामध्ये ग्राहकांना प्रत्येक वेळी ५०० रुपयांपर्यंत व्यवहार करणे शक्य होणार आहे. या वॉलेटमध्ये ग्राहक २००० रुपये दिवसातून दोन वेळा फंड लोड करता येणार आहे. म्हणजेच ग्राहकांना दिवसातून चार हजारांचा निधी ठेवणे यामध्ये शक्य होणार आहे.
 
कशी सुरूवात करावी ?

१) प्रथम पेटीएम अँप उघडून युपीआय लाईट बटण दाबावे
२) युपीआय लाईटसाठी आवश्यक असणारे बँक अकाऊंट निवडावे.
३) आवश्यक ती रक्कम त्यामध्ये टाकावी.
४) एम पिन टाकून सेट अप पूर्ण करावे
५) त्यानंतर व्यवहार करता येईल.
 
यामध्ये ग्राहकांना नेहमीप्रमाणे अनेक पेमेंट प्रणालीद्वारे पैसे भरता अथवा मिळवता येतात. पेटीएमने एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय, येस बँक अशा बँकाबरोबर भागीदारी केली आहे. या पेमेंटद्वारे छोटी मोठी खरेदी, किराणा खरेदी, पेट्रोल भरणे अथवा किरकोळ व्यवहार करणे सहज शक्य होणार आहे.