४ वर्षांच्या दिव्यांग मुलीवर 'साजिद'ने केला बलात्कार; मंदिर परिसरातून केले होते अपहरण

    15-May-2024
Total Views |
 sajid
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील गंगोह जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. साजिद नावाच्या या नराधामाने याने ४ वर्ष वयाच्या या मुलीला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने पीडितेला अर्धमेल्या अवस्थेत सोडले होते. ही तरुणी गावातील एका मंदिरात प्रसाद खाण्यासाठी गेली होती. पीडित मुलगी दिव्यांग असून बोलू शकत नाही. साजिदला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
 
ही घटना रविवार, १२ मे २०२४ सायंकाळी घडली. अल्पवयीन मुलाचा विनयभंग केल्याप्रकरणी साजिदवर यापूर्वीच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जामिनावर सुटल्यानंतर तो ३ महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. येथे रविवारी गावातील मंदिरात भंडारा सुरू होता. गावातील सर्व लोक प्रसाद खाण्यासाठी मंदिरात आले होते. या लोकांमध्ये एक ४ वर्षांची मुलगी देखील होती.
  
साजिदने मंदिर परिसरातून मुलीचे अपहरण करून तिला उसाच्या शेतात नेले. साजिदने शेतात मुलीवर बलात्कार केला. मुलीची तब्येत खूपच खालावली, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. पीडितेला मृत समजून साजिदने तेथून पळ काढला. दरम्यान, मुलगी सापडत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना शेतात मुलगी गंभीर अवस्थेत आढळून आली. पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे प्रकरण विविध समाजाशी संबंधित असल्याने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात पोहोचले. काही वेळातच साजिद सापडला.
  
चौकशीत साजिदने गुन्ह्याची कबुली दिली. दि. १३ मे रोजी पोलिसांनी साजिदला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली. त्याच्यावर आयपीसीच्या कलम ३६३ आणि ३७६ सह पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पीडितेचे समुपदेशन आणि उपचार सुरू आहेत.