सोने चांदी महाग झाले सोने १० ग्रॅम ७३२५० व चांदी १ किलो ८७६०० रुपये!

    15-May-2024
Total Views |

Gold
 
 
मुंबई: भारतातील सोने चांदी महागले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या दरात वाढ झाल्याने आज सराफा बाजारात सोने उसळले आहे. युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर युएस गोल्ड स्पॉट दरात ०.०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील सराफा बाजारात 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील दिलेल्या माहितीनुसार देशात २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम दरात ४०० रूपयांनी वाढ होत सोने ६७१५० रुपयांवर पोहोचले आहे. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ४३० रुपयांनी वाढ होत दर ७३२५० रुपयांवर पोहोचले आहेत.
 
मुंबईतील २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम मागे ४०० रुपयांना वाढले असून दर ६७१५० रुपयांवर व २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ४३० रुपयांनी वाढ झाली असून किंमत ७३२५० रुपयांवर पोहोचली आहे. भारतातील एमसीएक्स निर्देशांकात सोने निर्देशांकात ०.१० टक्क्यांनी वाढ झाली असून ७२३७० रुपयांवर सोने पोहोचले आहे.
 
भारतातील चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या निर्देशांकात ०.१५ टक्क्यांनी वाढ होत प्रति किलो चांदी ८५५४९.०० पातळीवर पोहोचले आहे. भारतातील चांदीच्या प्रति किलो दरात ०.४६ टक्क्यांनी वाढ होत चांदी १ किलोला ४०० रुपयांनी महागली आहे. तर मुंबईत चांदीच्या प्रति किलो दरात ४०० रुपयांनी वाढ होत चांदी ८७६०० रूपयावर पोहोचली आहे.