कमरेचं सोडून डोक्याला, उबाठाचं मत काँग्रेसला : एकनाथ शिंदे

    15-May-2024
Total Views |
Eknath Shinde On opposition

कल्याण:
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेच्या हदयातील प्रधानमंत्री आहे. त्यांच्यासारखा पंतप्रधान झाला नाही, होणार ही नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी भारताचे वैभव आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कधीच निराशा दिसलेली नाही. २०१४ आधी देशाचा कोणताच पंतप्रधान कल्याणमध्ये आला नाही. पण २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळा कल्याणमध्ये आलेत.हे आपल्या सगळ्याचं भाग्य आहे, असे गौरवउद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण येथील सभेत काढले. मात्र भरकटलेले विरोधक मोदींच्या नावानं खडे फोडतात, अशी टीका ही त्यांनी विरोधकांवर केली.

इंडिया आघाडी पराभवाच्या भितीने भरकटली आहे. त्यांच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानाची हुजरेगिरी सुरु केलीय. त्यांच्या मिरवणुकीत बॉम्बस्फोटाचा आरोपी दिसतो. पाकिस्तानी झेंडे रॅलीत मिरवतायत. त्यामुळे उबाठा गटाला सावरकरांचा अपमान झाला तरी चालतो. काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही, असे म्हणणारे चालतात, याला कमरेचं डोक्याला गुडांळणं म्हणतात, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कपिल पाटील, श्रीकांत शिंदे पंतप्रधानांच्या येण्याने विजयाची हॅट्रीक खेचून आणतील. त्यामुळे ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी आहे. ही राष्ट्र घडवणारी, देशाची प्रगती घडवणारी आणि फिर एक बार मोदी सरकार आणणारी ही निवडणूक आहे. म्हणून देशात मोदींच्या नावाचा गजर ऐकू येतो. विरोधक जरी मोदींना शिव्याशाप देत असले तरी देश सगळं पाहतोय की, एक अकेला मोदी कितनो को भारी पड रहा है. त्यामुळे ३७० कलम, राममंदिर अशा गोष्टी पंतप्रधान मोदींनी पुर्ण केल्या. त्यामुळे पंतप्रधान मोदी आपल्या प्रत्येक भाषणात देशाचं व्हिजन सांगतात. सेवा, समर्पण आणि गरिब कल्याणासाठी मोदी काम करत आहेत, असे मत ही शिंदे यांनी व्यक्त केले.