"एकनाथ शिंदे ७-८ तासांसाठी मुख्यमंत्री झाले होते, पण ठाकरेंनी..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट

    15-May-2024
Total Views |
 
Fadanvis & Shinde
 
मुंबई : २०१९ मध्ये एकनाथ शिंदे ७-८ तासांसाठी मुख्यमंत्री झाले होते. पण उद्धव ठाकरेंनी स्वत: मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "२०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये एकनाथ शिंदेंनी नेतृत्व केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. त्यावेळी शिंदे ७ ते ८ तासांसाठी मुख्यमंत्रीदेखील झाले होते. त्यांच्या घरात सुरक्षा व्यवस्थाही पुरवण्यात आली होती. परंतू, नंतर ठाकरेंनी स्वतःच मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला," असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
 
हे वाचलंत का? -  "नकली शिवसेना जेव्हा काँग्रेसविलीन होईल तेव्हा मला बाळासाहेबांची आठवण येईल!"
 
"उबाठा गट आता मराठी मतांवर जगण्याच्या मन:स्थितीत नाही. त्यांना आता मुस्लिम मतांवर गुजराण करायची आहे. आजवर काँग्रसने जेवढं तुष्टीकरणाचं आणि मतांच्या लांगूलचालनाचं राजकारण केलं नाही त्यापेक्षाही जास्त मतपेढीचे राजकारण उबाठा गट करत आहे," असेही ते म्हणाले.