भारताच्या विकास मार्गाला विस्तारण्यासाठी 'चाबहार ' बंदराचा विकास!

बंदराचा विकास करण्यासाठी मुलभूत सुविधा आवश्यक - जीटीआरआय

    15-May-2024
Total Views |

chbhar port
 
 
मुंबई: भारताने इराणबरोबर चाबहार पोर्टसाठी १० वर्षांचा करार केला होता. चाबहार पोर्टच्या या करारामुळे भारताच्या औद्योगिक संधीत मोठी वाढ झाली आहे.जागतिक पातळीवरील या पोर्टचे भौगोलिक स्थान महत्वाचे असल्याने भारताची व्यापारी झेप जगभर वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लॉजिस्टिकसदृष्ट्या भारताला मध्य आशियात व्यापार करणे सुलभ होणार असल्याने कार्गो वाहतूकीत मोठा लाभ होणार असल्याचे इंटेलिजन्स संस्था ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशेटिव (GTRI) या संस्थेने म्हटले आहे.
 
यावर अधिक भाष्य करताना संस्था म्हणाली की, 'चाबहार पोर्ट' हे इराणचे धोरणात्मक दृष्टीने महत्वाचे बंदर असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर या बंदराची अजून मान्यता नाही. या बंदराचा फायदा व प्रकल्पाचे यश हे त्याच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जटिल भू-राजकीय वातावरणाशी गुंतागुंतीचे आहे.' सोमवारी भारताने इराणबरोबर या बंदराचा वापरासाठी १० वर्षांचा करार केला होता.या व्यवहारात भारताचे इंडियन पोर्टस ग्लोबल (IPGL) व पोर्ट अँड मेरीटाईम ऑर्गनायझेशन ऑफ इराण यांचा समावेश आहे.
 
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,आयपीजीएल या करारानुसार १२० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे तर अधिकचे २५० दशलक्ष डॉलर्स देये (Debt) म्हणून उभारणार आहे. गल्फ ऑफ ओमान स्थित हे बंदर विकसित करण्याचे भारताने २००३ साली ठरवले आहे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेले हे बंदर व्यापारासाठी महत्वाचे असल्याने व अफगाणिस्तान व मध्य आशियाकडे पोहोचण्यासाठी महत्वाचे ठरल्याने भारताने हा करार केला आहे.
 
यामध्ये रस्ता व रेल्वे या दोन माध्यमातून कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी असलेल्या या प्रकल्पाला इंटरनॅशनल नॉर्थ - साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर म्हणतात. इराणच्या संशयित आण्विक कार्यक्रमावर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे बंदराचा विकास मंदावला होता.
 
झालेल्या कराराविषयी अधिक बोलताना,'कार्गो प्रवाहाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी चाबहारमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, प्रक्रिया आणि कर्मचारी आहेत याची भारताने खात्री केली पाहिजे. तरीही बाह्य राजकीय दबाव आणि प्रादेशिक अस्थिरतेमुळे अशा भव्य प्रकल्पांसाठी आवश्यक असलेली व्यापक स्थिरता हे एक महत्त्वाचे आव्हान आहे,' GTRI सह- संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले आहेत.
 
ते पुढे म्हणाले की, बंदराचा विकास हा भारताच्या सामरिक क्षमता वाढवण्याच्या आणि मध्य आशिया आणि त्यापलीकडे व्यापार मार्गांचा विस्तार करण्याच्या धोरणात्मक दूरदृष्टीचा पुरावा आहे. GTRI नुसार, शाहीद कलंतारी आणि शाहिद बेहेश्ती टर्मिनल्सचा समावेश असलेले चाबहार बंदर, पाकिस्तानच्या ग्वादर बंदराच्या पश्चिमेला सुमारे १७० किमी अंतरावर आहे. ते होर्मुझच्या गर्दीच्या सामुद्रधुनीला पर्यायी सागरी मार्ग देते.
 
चाबहार हा इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (INSTC) चा एक अविभाज्य घटक आहे, जो भारताला इराण, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपशी जोडणारा ७२०० किमीचा बहु-मोडल वाहतूक मार्ग आहे. या कॉरिडॉरमुळे सुझ कनाल रुटपेक्षा प्रवासाचे २५ ते ३० दिवस वाचू शकतील.
 
१० वर्षांच्या करारावर स्वाक्षरी करताना, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) चे महासंचालक अजय सहाय म्हणाले की, अफगाणिस्तान, युरेशिया, मध्य आशिया आणि युरोप अविभाज्य असलेल्या व्यापार मार्गांच्या विविधीकरणाद्वारे INSTC चा भाग म्हणून हे बंदर भारताला धोरणात्मक फायदे प्रदान करते.