प्रबीर पुरकायस्थला जामीन मंजुर!

    15-May-2024
Total Views |
Prabir Purkayastha

नवी दिल्ली:
बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीए) अटकेत असलेला न्यूजक्लीकचा संपादक प्रबीर पुरकायस्थ यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजुर केला आहे.युएपीए अंतर्गत एका प्रकरणात ऑनलाइन न्यूज पोर्टल न्यूजक्लिकचा मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ याची अटक आणि कोठडी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केली. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने जामीन बाँड भरण्याच्या अटीवर पुरकायस्थला सोडण्याचे आदेश दिले आहेत.

पुरकास्थ यांना रिमांड अर्जाची प्रत प्रदान करण्यात आली नाही, त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने हा आदेश दिला आहे.न्यायालयाने पुढे म्हटले की, या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याने, पुरकायस्थला केवळ जामीन आणि जामीन बाँडवर सोडता येईल. अन्यथा त्याची जामीनाशिवाय सुटका होऊ शकली असती, असे न्यायालयाने म्हटले आहे.