काँग्रेसी सरकारचे पत्रकारांसाठीचे फतवे! हिंदूंसाठी वेगळा 'न्याय'!

"तुम्ही घातलेला कलवा पडद्यावर दिसू नये";यूपीएच्या सत्ताकाळात पत्रकारांना अधिकाऱ्यांकडून आदेश!

    15-May-2024
Total Views |
DD News journalist exposes Congress anti-Hindu ideologies

नवी दिल्ली :
ज्येष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी युपीएच्या सरकारमध्ये सरकारी न्युज वाहिनी डीडी न्यूजमध्ये पत्रकारांना त्यांच्या हिंदू म्हणुन ओळख असणाऱ्या गोष्टी कॅमेरावर दिसण्यापासून मनाई केली जात होती असा खुलासा केला आहे. त्यांचबरोबर काँग्रेस सरकारच्या काळात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची मुलाखत काटछाट करुन दाखवण्यात आली होती असंही त्यांनी म्हटलं आहे.डीडी न्यूजचे पत्रकार आणि अँकर अशोक श्रीवास्तव म्हणाले की, जेव्हा यूपीए सत्तेत होते, तेव्हा एके दिवशी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मला फोन केला आणि म्हणाले..." तुम्ही तुमची ओळख म्हणून हातात गंडा घालता. त्यामुळे युपीए सरकारच्या काळात हातात घातलेल्या कलवा पडद्यावर दिसू नये, असे त्या अधिकाऱ्याने म्हणटले होते. ही घटना २००७ च्या सुमारास घडली असावी. असंही ते म्हणाले. " 
 
अशोक श्रीवास्तव यांच्या या खुलाशाआधीही काँग्रेसच्या काळात दूरदर्शनवर हिंदू चिन्हे दाखवली जात नसल्याचा आरोप झाला आहे. लोक गायिका मालिनी अवस्थी यांनी एका न्यूज शोमध्ये याचा खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की २००५ मध्ये दूरदर्शनवर एक धार्मिक भजन गाण्यापासून रोखण्यात आले कारण त्यात भगवान रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, असा उल्लेख होता.दरम्यान अशोक श्रीवास्तव यांच्या विधानावर आक्षेप घेत काँग्रेसची बाजू घेण्यासाठी जुबेरने या प्रकरणात उडी घेतली आणि वस्तुस्थिती तपासण्यासाठी त्यांने अशोक श्रीवास्तव यांच्या बोलण्यावर प्रश्न उपस्थित करत त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला, ज्यामध्ये श्रीवास्तव कलवा परिधान केलेले दिसत आहेत, असे आनंद रंगनाथ यांनी श्रीवास्तव यांची बाजू घेत म्हणटले आहे.

मात्र जुबेरने शेअर केलेला तो फोटो २०१३ मधील आहे. यामध्ये अशोक श्रीवास्तव डीडी न्यूजवर एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून त्यांनी कलवा घातला आहे. हे दाखवून जुबेरला हे सिद्ध करायचे होते की, काँग्रेसच्या राजवटीत अशोक श्रीवास्तव यांना डीडी न्यूजवर कलाव न दिसण्याबद्दल काहीही सांगितले नव्हते आणि ते खोटे बोलत आहेत. जुबेरने लिहिले, “जर तुम्ही खोटे बोलत असाल तर अशाप्रकारे खोटे बोला की तुम्हाला सहज पकडले जाणार नाही.”यावरून अशोक श्रीवास्तव यांचे विधान खोटे आहे, असे सिद्ध झाले नसले तरी जुबेरकडून काँग्रेसची घेतली जाणारी बाजू उघडी पडली. २०१३ मध्येही अशोक श्रीवास्तव कलवा घातल्यामुळे खोटे बोलत असल्याचा दावा जुबेरने केला होता. वास्तविक, अशोक श्रीवास्तव यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये कोठेही असे म्हटले नाही की डीडी न्यूजच्या अधिकाऱ्यांनी विचारल्यानंतर त्यांनी कलव घालणे बंद केले आहे. त्याने एवढंच सांगितलं की, त्यांना पडद्यावर कलाव दाखवू नका असं सांगितलं होतं.
 
दुसरे म्हणजे, जुबेरने शेअर केलेला फोटो २०१३ मधला आहे. उलट काँग्रेस सरकारचा हा तोंडी आदेश २००६ च्या आसपास असल्याचं अशोक श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. अशा स्थितीत जुबेरला काहीही खोटे सिद्ध करता आले नाही.जुबेरच्या या अयशस्वी तथ्य तपासणीनंतर अशोक श्रीवास्तव यांनी त्याचा पर्दाफाश केला. आधी त्याने जुबेरला त्याच्याशी वादविवाद करण्याचे आव्हान दिले, पण नंतर त्यांनी सांगितले की, त्याचा भूतकाळातील रेकॉर्ड पाहता जुबेर त्याच्याशी वादविवाद करणार नाही.