कार्तिक आर्यनच्या चंदु चॅम्पियन चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, चाहत्यांची उत्सुकता वाढली

    15-May-2024
Total Views |
chandu champion  
 
 
मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा कलाकार आहे. त्याच्या आगामी ‘चंदु चॅम्पियन’ (Chandu Champion) या चित्रपटाचे पहिलो पोस्टर प्रदर्शित झाले असून चाहते संपुर्ण चित्रपट पाहण्यास आता अधिक आतुर झाले आहेत. या (Chandu Champion) चित्रपटाच्या पोस्टरवरुन आजवर कार्तिकला ज्या भूमिकेत आणि अंदाजात पाहिले नाही ते दिसणार याची खात्री वाटत आहे.
 
'चंदु चॅम्पियन' च्या या पोस्टरमध्ये कार्तिक आर्यन एका रेसलरच्या लूकमध्ये दिसत आहे. त्याची शरीरयष्टी एखाद्या कसलेल्या खेळाडूची असते अगदी तशीच दिसून येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले असून यात एक मराठमोळा कलाकार देखील दिसणार आहे. आरोह वेलणकर या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. आणि यात तो एका अतिशय महत्वपुर्ण भूमिकेत दिसणार आहे.
 

chandu champion  
 
१४ जून २०२४ रोजी 'चंदू चॅम्पियन' देशभरात प्रदर्शित होणार असून ही एक सत्य घटना आहे.. साजिद नाडियादवाला यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटातील अन्य कलाकारांबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. तसेच, कार्तिकचा आगामी भुल भूलैय्या ३ देखील येणार असून त्यातही नव्या रुपात तो दिसणार आहे.