चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीला!

    15-May-2024
Total Views |
 
Bawankule & Raj Thackeray
 
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी ते राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
येत्या २० मे रोजी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणूका होणार आहेत. पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. राज ठाकरेंनी महायूतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी महायूतीच्या उमेदवारांसाठी सभादेखील घेतल्या आहेत.
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा मुंबईमध्ये प्रचारासाठी दाखल झाले आहेत. शुक्रवारी राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दादरमधील शिवाजी पार्कमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. ते पहिल्यांदाच एका मंचावर येणार असल्याचेही बोलले जात आहे. त्याआधी पंतप्रधान मोदींचा रोड शो होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आणि पाचव्या टप्प्यातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये त्यांच्यात काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.