एलआयसीला मोठा दिलासा १० टक्के पब्लिक होल्डिंग्ससाठी मुदतवाढ घोषणेनंतर शेअर उसळला

तीन वर्षांसाठी पब्लिक होल्डिंग्ससाठी मुदतवाढ

    15-May-2024
Total Views |

LIC
 
 
मुंबई: एलआयसीला (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) मोठा दिलासा मिळाला आहे. एलआयसीने म्हटल्याप्रमाणे,संस्थेला १० टक्के भागभांडवल स्थिर ठेवण्यासाठी सेबीने तीन वर्षांची मुदत वाढवून दिली आहे.'आम्हाला सेबीने (Securities Exchange Board of India) ने १४ मे २०२४ च्या परिपत्रकानुसार, १० टक्के पब्लिक शेअरहोल्डिंग्स मिळवण्यासाठी अधिकची ३ वर्ष वाढीव मुदत म्हणून दिली आहे. नियम १९ (२) (b) (v) सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) अँक्ट १९५७ अधिनियमानुसार,नोंदणीकृत केल्यानंतर पाच वर्षाच्या आत ही वाढीव मुदत दिली असल्याचे एलआयसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
 
आता एलआयसी १६ मे २०२७ पर्यंत एलआयसीला १० टक्के पब्लिक शेअरहोल्डिंग्स वाढवण्यासाठी मुदत मिळालेली आहे.
 
सध्याच्या घडीला एलआयसीकडे ३.५ टक्क्यांपर्यंत शेअर होल्डिंग आहे.आगामी काळात सरकारला अधिकचे ६.५ टक्के भाग भांडवल वळवणे अनिवार्य ठरणार आहे.सरकारने एलआयसी आयपीओत ३.५ टक्के भागभांडवल वळवले होते. एलआयसी हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ होता. हा आयपीओ २१००० कोटींचा होता. आयपीओ मे २०२२ साली उघडण्यात आला होता.सर्व सूचीबद्ध कंपन्यांसाठी किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग मानदंड किमान 25% सार्वजनिक फ्लोट अनिवार्य करतात.
 
पाच सरकारी बँका - इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचा सरकारी हिस्सा ७५% पेक्षा जास्त आहे. घोषणेनंतर LIC चे शेअर्स आजच्या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचले आहेत, एल आयसीचे शेअर ६.८२ टक्क्यांनी वाढत ९९४.५० पातळीवर स्थिरावला आहे.