मोठी बातमी: आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना केवायसीची गरज नाही

सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी केवायसी अट काढून टाकली

    15-May-2024
Total Views |

SEBI
 
 
मुंबई: आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी केवायसी अट काढून टाकली आहे. आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना केवायसीसाठी आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्याची गरज भासणार नाही.
 
ही केवायसी अट काढून टाकल्याने आता गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणे अधिक सोपे होणार आहे. Know Your Customer (KYC) याआधी म्युच्युअल फंड, बँक,आर्थिक संस्था, इतर संस्था गुंतवणूकीपूर्वी मागत मात्र आता १४ मे परिपत्रकानुसार सेबीने नियमात फेरबदल केले आहेत.
 
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी केवायसी अटीची पूर्तता करण्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंतची मुदत दिली होती. परंतु या नवीन निर्णयामुळे आता गुंतवणूक सुकर होणार आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना यापूर्वी बँक पासबुक, अकाऊंट स्टेटमेंट या आधारे केवायसी करणे गरजेचे होते.
 
'सिक्युरिटीज मार्केटमधील भागधारकांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे आणि ग्राहकांकडून व्यवहार सुलभतेसाठी,१२ ऑक्टोबर २०२३ च्या मास्टर परिपत्रकातील तरतुदींचे पुनरावलोकन केले गेले आहे आणि जोखीम व्यवस्थापन फ्रेमवर्क सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,' असे परिपत्रकात नमूद केले आहे.
 
याशिवाय एजन्सी केवायसी रजिस्ट्रेशन एजन्सीला मात्र गुंतवणूकदारांचे पॅन व पत्ता यांची खात्री करावी लागणार आहे. या माहितीच्या आधारे पॅन व आधार कार्ड लिंक आहे की नाही याची शहानिशा व्यक्तीची माहिती मिळताच दोन दिवसांच्या आत करावी लागणार आहे.
 
रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्क आधारे ग्राहकांच्या माहितीची शहानिशा केवायसी रेकॉर्ड मिळाल्यानंतर दोन दिवसांच्या आत करावे लागणार आहे ज्यामध्ये पॅन, अकाऊंटवरील नाव, पत्ता या गोष्टीचा समावेश त्यात असणार आहे.