भावेश भिंडेवर बलात्काराचा गुन्हा!

    15-May-2024
Total Views |
 
Bhavesh Bhinde
 
मुंबई : घाटकोपर दुर्घटनेतील होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेबाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. भावेश भिंडेच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. तो सध्या फरार असून मुंबई पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, भावेश भिंडे याच्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. यातच जानेवारी महिन्यात भावेश भिंडेच्या विरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात एक बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याशिवाय २००९ मध्ये भावेश भिंडेने अपक्ष विधानसभेची निवडणूक लढवल्याची माहितीही पुढे आली आहे.
 
हे वाचलंत का? -  मोदींच्या रोड शोमुळे वाहतूकीत बदल! 'या' पर्यायी मार्गांचा वापर करता येणार
 
१३ मे रोजी घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर बेकायदेशीर होर्डिंग पडल्याने १४ लोकांचा मृत्यू झाला. हे होर्डिंग भावेश भिंडेच्या इगो मीडिया कंपनीच्या मालकीचे असून ते बेकायदेशीरपणे बांधण्यात आले होते. दरम्यान, भावेश भिंडे सध्या फरार असून त्याचा मोबाईलही बंद येत आहे. मुंबई पोलिसांच्या पथकांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.