श्रीरामललाचा प्रसाद जाणार थेट लंकेतील अशोक वाटीकेत!

    15-May-2024
Total Views |

Ramlala-Ashok vatika
(Ramlala-Ashok Vatika)

मुंबई (प्रतिनिधी) : श्रीलंकेतील अशोक वाटीका (Ashok Vatika) येथे सीता माता श्रीलंका मंदिर ट्रस्टतर्फे १७, १८, १९ मे रोजी कार्यक्रम होत आहे. विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ प्रचारक दिनेश चंद्र जी यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. प्रति १२ वर्षानंतर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी अयोध्येतील श्रीरामललाचा प्रसाद, शरयू जल, गंगा जल, सीतामातेसाठी हातमागाची साडी अशोक वाटीका येथे नेण्यात येणार आहे. या धार्मिक प्रवासामुळे भारताच्या आसपासच्या देशांमध्ये हिंदू विचारधारा आणि हिंदुत्व शक्ती मजबूत होईल, असा विश्वास दिनेश चंद्र जी यांनी व्यक्त केला आहे.