सुशील कुमार मोदींना सरसंघचालकांनी वाहिली आदरांजली

    14-May-2024
Total Views |

Sushil Kumar Modi - Mohanji Bhagwat

मुंबई (प्रतिनिधी) :
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार सुशील कुमार मोदी(Sushil Kumar Modi) यांचे सोमवार, दि. १३ मे रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. गेले सहा महिने ते कर्करोगाशी झुंज देत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सुशील कुमार मोदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

हे वाचलंत का? : अभिमानास्पद! पंचतंत्र, रामचरितमानस आणि सहृदयलोक-लोकनाची युनेस्कोने घेतली दखल...

"सुशीलजींच्या आकस्मिक निधनाने खूप दुःख झाले. संघाचे निष्ठावान स्वयंसेवक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस सुशीलजी यांना संपूर्ण देशाची आणि विशेषतः बिहारची चिंता होती. त्यांच्या निधनाने एक जागृत समाजसेवक आणि कुशल राजकीय नेता आपण गमावला आहे. सार्वजनिक जीवनातील तत्त्वनिष्ठ सचोटी आणि पारदर्शकतेचे ते एक आदर्श उदाहरण होते. त्यांच्या दिवंगत आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना."