सुशील कुमार मोदींच्या निधनावर अभाविपकडून शोक व्यक्त

    14-May-2024
Total Views |

Sushil Kumar Modi ABVP

मुंबई (प्रतिनिधी) :
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi ABVP) यांचे सोमवार, दि. १३ मे रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. गेले सहा महिने ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे.

सुशील कुमार मोदी यांच्या निधनाने विद्यार्थी परिषद परिवाराला दु:ख झाले आहे. १९८३, १९८४, १९८५ या वर्षांमध्ये सुशीलजींनी अभाविपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी पार पाडण्याबरोबरच आणीबाणीच्या विरोधात आंदोलनात मोठी भूमिका बजावली होती. देशात विद्यार्थी चळवळीची मजबूत ओळख निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आणीबाणीच्या काळात कुख्यात 'मिसा' अंतर्गत ५ वेळा अटक झाली होती तसेच देशाला आणीबाणीच्या छायेतून मुक्त करण्यासाठी जवळपास २४ महिने ते तुरुंगात राहिले होते.

हे वाचलंत का? : सुशील कुमार मोदींना सरसंघचालकांनी वाहिली आदरांजली

प्रभावीपणा, संघटन कौशल्य आणि मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्व हे त्यांचे वैशिष्ट्य होते. प्रथम एक खंबीर विद्यार्थी नेता, नंतर राजकारणात प्रवेश केल्यानंतर एक कार्यक्षम प्रशासक बनण्यापासूनचा त्यांचा प्रवास देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. देशात कर सुधारणा लागू करण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

स्व. सुशील कुमार मोदी यांच्या निधनाबद्दल अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजशरण शाही, राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल, राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान आणि राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे निमंत्रित सदस्य प्रा. मिलिंद मराठे यांना अभाविपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही प्रार्थना केली आहे.