आरबीआयकडील सोन्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ एकूण साठा ' इतक्या ' टनने वाढला

आरबीआयच्या सोने साठ्यात २७.४६ टनने वाढत ८२२.१० कोटीवर

    14-May-2024
Total Views |
 
Gold
 
 
मुंबई: आरबीआयकडील सोन्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. 'Half Yearly Report on Management of Foreign Exchange Reserves' या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सोन्याच्या साठ्यात आर्थिक वर्ष २७.४६ मेट्रिक टनने वाढ होत एकूण साठा ८२२.१० मेट्रिक टनांपर्यंत पोहोचला आहे.
 
युएस डॉलरच्या मुल्यांकनात, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताच्या विदेशी मुद्रेत ८.१५ टक्क्यांनी वाढ झाली. मागील आर्थिक वर्षात या साठ्यात ७.८१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने आपल्या ताज्या अहवालात नमूद केले आहे की निव्वळ मध्यवर्ती बँक खरेदीचा बहु-वर्षांचा कल प्रस्थापित दिसत आहे, परंतु काही केंद्रीय बँका अलीकडील किमतीच्या वाढीला प्रतिसाद म्हणून बाजूला थांबण्यास तयार असतील.
 
आरबीआयच्या एकूण सोने साठा मार्च २०२४ अखेरीस ४०८.३१ मेट्रिक टन होता जो मार्च २०२३ अखेरीस एकूण साठा ३०१.१० टन होता. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील ४३७.२२ मेट्रिक टनपैकी ३८७.२६ टन साठा हा आरबीआयने बँक ऑफ इंग्लंडबरोबर आपल्या सुरक्षित कस्टडीत ठेवला होता. तर २६.५३ टन साठा हा सोन्याच्या ठेवी (Deposit) स्वरूपात ठेवला होता.
 
Balance of Payments बेसिसवर होणारी आयात पाहता डिसेंबर २२०३ मध्ये विदेशी मुद्रेत ११ महिन्यातील सर्वाधिक वाढ डिसेंबर २०२३ पर्यंत झाली होती. मुख्य मुदतठेवीतील तुलनेत कमी काळ देयाचे गुणोत्तर (Short term debt ratio) हा डिसेंबर २०२२ मधील २३ टक्क्यांवरून घसरत डिसेंबर २०२३ पर्यंत २०.३ टक्क्यांवर घसरला होता.
 
भांडवलाची चढ उतार आवक जावक (Capital Inflow) पाहता संचयी आवक व थकीत कमी काळाचे देय) मधील गुणोत्तर हे डिसेंबर २०२२ मधील ७२.७ वरून घसरत डिसेंबर २०२३ मध्ये ७०.४ वर पोहोचले आहे.
एकूण परदेशी मालमत्तेत आर्थिक वर्ष २२०४ पर्यंत ५०९.६९ अब्ज डॉलर पैकी,४६८.९९ अब्ज डॉलर हे सिक्युरिटीजमध्ये गुंतवले गेले होते. याशिवाय,६२.१७ अब्ज डॉलर हे इतर सेंट्रल बँकेत गुंतवले होते. व राहिलेले ३९.७९ अब्ज डॉलर परदेशी व्यवसायिक बँकेत गुंतवले गेले होते