शुश्रुषा सिटीझन्स को-ऑप रुग्णालयात परिचारिका दिन उत्साहात साजरा!

    14-May-2024
Total Views |
 
Nurse
 
मुंबई : आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन शुश्रुषा रुग्णालयातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्यसेवेत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या निर्सिंग अधिक्षक डॉ. अर्चना सांगळे, सहाय्यक सौ. प्रियांका सावंत यांच्यासह सर्व परिचारिक उपस्थित होत्या.
 
परिचारिका या आरोग्य सेवा व्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असून त्या रुग्णसेवेत महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. रुग्णांना औषधे देणे, त्यांची काळजी घेणे, आजारासंबधी लक्षणाचे निरीक्षण करणे, रुग्णांच्या मानसिकतेची काळजी घेणे या सर्व भूमिका परिचारिकांकडून निभावल्या जातात. रुग्णसेवा करणे हाच आमचा ध्यास आहे आणि रुग्णांच्या चेहर्‍यावरचे हसू हीच आमच्या कामाची पोचपावती आहे, अशी त्यांची कायम भूमिका असते.