सलमान खान प्रकरणात सहाव्या आरोपीला हरियाणातून पोलिसांनी घेतलं ताब्यात

    14-May-2024
Total Views |
अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोलीबार प्रकरणात आत्तापर्यंत ६ आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले.
 
salman  
 
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात (Salman Khan House Firing Case) आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील सहाव्या आरोपीला पोलिसांनी हरियाणातून ताब्यात घेतले आहे. यापुर्वी पाच आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरत, राजस्थानवरुन ताब्यात घेतले होते. दरम्यान, सहावा आरोपी हरपाल सिंग याला हरियाणातून अटक केली असून या आरोपीने पाचवा आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती आणि रेकी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या अशी माहिती मिळत आहे. हरपालला आज १४ मे २०२४ रोजी विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
 
 
 
सलमान खानच्या बांद्रा येथील गॅलेक्सी घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली होती. सलमान खानच्या घरावर ४० गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपींनी ५ गोळ्याच फायर केल्या होत्या. तर या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी अनुज थापन याने मुंबईतच तुरुंगात चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.