इंडी आघाडीला २४० जागा मिळतील : पृथ्वीराज चव्हाण

    14-May-2024
Total Views |

Pruthviraj Chavan 
 
मुंबई : केंद्रात सत्ताबदल होणार असून इंडिया आघाडीला २४० ते २६० पर्यंत जागा मिळतील, असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लोकांची सहानुभूती असल्याचेही त्यांनी म्हटले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला.
 
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "केंद्रात सत्ताबदल होणार आहे. इंडिया आघाडीला २४० ते २६० पर्यंत जागा मिळतील. तसेच राज्यात महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागा मिळतील. भाजपला २७२ जागाही मिळणार नाहीत त्यांना फार कमी जागा मिळतील. भाजपकडून २०४७ पर्यंत विकसित भारताची संकल्पना मांडण्यात येत आहे. पंरतू, याबाबत काहीही स्पष्टता नाही."
 
हे वाचलंत का? -  घाटकोपर दुर्घटनेवरुन राजकारण तापलं! होर्डींगचा मालक ठाकरेंच्या घरात; भाजपचा आरोप
 
"उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लोकांची सहानुभूती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला याचा फायदा होणार असून ३२ ते ३५ जागा मिळतील. तसेच अजित पवार गटाची एकही लोकसभेची जागा निवडून येणार नाही," असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.