नेत्तारू हत्याकांड – पीएफआयच्या २० जणांवर दोषारोपपत्र दाखल

    14-May-2024
Total Views |
Praveen Nettaru Murder Case


नवी दिल्ली:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) रुद्रेश आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येप्रकरणी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) २० जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दोषारोपपत्र दाखल केले आहे.

एनआयएने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात पीएफआयच्या देशविरोधा जिहादी मनसुब्यांचा खुलासा करण्यात आला आहे. पीएफआयने समाजात दहशत, जातीय द्वेष आणि अशांतता निर्माण करण्यासाठी आणि २०४७ पर्यंत इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याचा आपला अजेंडा ठेवला होता. विशिष्ट लोकांची हत्या करण्यासाठी सर्व्हिस टीम्स किंवा किलर स्क्वाड्स तयार केल्या होत्या. या सर्व्हिस टीम सदस्यांना शस्त्रे तसेच विशिष्ट समुदाय आणि गटांशी संबंधित व्यक्ती/नेते ओळखण्यासाठी, त्यांची यादी करण्यासाठी आणि त्यांचे निरीक्षण करण्यासाठी आक्रमण आणि पाळत ठेवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते, असे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

पीएफआयने बंगळुरूमध्ये झालेल्या बैठकीत प्रवीण नेत्तारू आणि रुद्रेश यांना लक्ष्य करण्यात आले होते, असेही दोषारोपपत्रात सांगण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यासाठी शस्त्रांचीदेखील व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.