"धर्मांतरण कर नाहीतर तुझ्या मुलींना मारून टाकेल"; 'मोईन शेख'ने दिली महिलेला धमकी

    14-May-2024
Total Views |
 Indore
 
भोपाळ : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मोईन शेख नावाच्या व्यक्तीने एका महिलेचे लैंगिक शोषण केले आणि तिच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकल्याची घटना समोर आली आहे. धर्मांतर न केल्यास मोईनने महिलेच्या मुलींना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरमधील एका महिलेने सांगितले की, ती काही काळापासून तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. काही वर्षांपूर्वी तिचा नवरा तिला सोडून गेला होता. तिला तीन मुली आहेत. ती तिच्या मुलींसोबत पतीपासून वेगळी राहते. महिलेने सांगितले की, तिच्या पतीचा मित्र मोईन शेख तिच्या घरी येत असे. तिचा नवरा तिला सोडून गेल्यावरही मोईन शेख तिच्या घरी येत असे. मोहिनने महिलेशी जवळीकता वाढवली. यानंतर त्याने महिलेवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले.
 
मोईन शेखने मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्याने महिलेला सांगितले की जर तिला काही हरकत नसेल तर तो तिच्याशी लग्न करेल. तो बराच वेळ महिलेला लग्नाचे आश्वासन देत राहिला. यानंतर त्याने आपले म्हणणे मागे घेण्यास सुरुवात केली. जेव्हा जेव्हा महिलेने त्याला लग्न करण्यास सांगितले तेव्हा तो नवनवीन बहाणे काढत असे. यानंतर त्याने लग्न करण्यासाठी महिलेसमोर धर्म परिवर्तनाची अट घातली. जोपर्यंत महिलेने इस्लाम स्वीकारला नाही तोपर्यंत मी तिच्याशी लग्न करणार नाही, असे त्याने सांगितले.
 
मोईन शेखने महिलेला धमकी दिली की, जर तिने धर्मांतर केले नाही तर मी तिच्या मुलींना मारून टाकेल. महिलेने असेही सांगितले की, तिला सोडल्यानंतर मोईन शेखने दुसरीकडे लग्न केले आणि लग्नाशिवाय राहण्यास सांगू लागला. याप्रकरणी महिलेने इंदूर पोलिसात एफआयआर दाखल केला आहे.