विजयाच्या हॅट्रिकसाठी मोदी झाले सज्ज! वाराणसीतून पंतप्रधानांनी भरला तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज

    14-May-2024
Total Views |
 pm modi
 
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी मोदींनी वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर जाऊन पूजा केली. उमेदवारी अर्ज भरताना मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना मोदींनी या निवडणुकीत ३ लाख ७१ हजार मतांनी विजय मिळवला होता. तर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४ लाख ७९ हजार मतांनी विजय मिळवला होता.