घाटकोपर दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखांपर्यंत आर्थिक साहाय्य!

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घाटकोपर दुर्घटनेतील जखमींच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट

    14-May-2024
Total Views |
Mangalprabhat Lodha on Ghatkopar accident

मुंबई:
वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांची पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजावाडी हॉस्पिटल येथे जाऊन भेट दिली. तसेच अडीज लाखापर्यंत आर्थिक साहय्य जखमींना केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सद्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये १ व्यक्ती ICU मध्ये असून इतरांच्या प्रकृतीमध्ये समाधानकारक सुधारणा होत असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारकडून केला जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यामंत्री यांच्याशी चर्चा करून जखमींना कायद्यातील तरतुदींप्रमाणे योग्य तो आर्थिक मोबदला दिला जाईल, असे देखील पालकमंत्री लोढा यांनी सांगितले. ६०% पेक्षा कमी व्यंग असल्यास अशा व्यक्तींना ७५,००० रुपये तसेच ६०% पेक्षा जास्त व्यंग असल्यास, त्या व्यक्तींना अडीच लाख रुपये सरकारद्वारे देण्यात येतील. तसेच किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपये देण्यात येतील अशी घोषणा यावेळी पालकमंत्री लोढा यांनी केली आहे.

सदर जाहिरातीचे मोठे होर्डिंग हे पेट्रोल पंपाजवळ अनधिकृतरित्या बांधण्यात आले होते. महापालिकेने नोटीस बजावून सुद्धा होर्डिंग हटवण्यात आले नाही. त्याचे सेफ्टी ऑडिट किंवा तत्सम प्रक्रिया सुद्धा झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे या घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला पोलीस पकडतील, त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. ही दुर्घटना नसून हत्या आहे असे मंत्री लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.