'जत्रा'चं शूटींग सुरु झालं आणि बाबांचं निधन..; कुशलने सांगितला तो भावूक क्षण

    14-May-2024
Total Views |

kushal  
 
 
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) सध्या हिंदी विनोदी कार्यक्रम 'मॅडनेस मचाएंगे' यात प्रेक्षकांना हसवत आहे. दरम्यान, या कार्यक्रमात आजवर कधीही न सांगितलेला एक भावूक क्षण कुशल बद्रिकेने व्यक्त केला आहे.
 
२००५ ला आलेला 'जत्रा' हा कुशलचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाचे शूटींग करायला कुशल उत्सुक होता. आयुष्यातला पहिला चित्रपट असल्यामुळे त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. 'जत्रा' या त्याच्या पहिल्याच चित्रपटाचं शुटींगचं पहिलं शेड्यूल झालं आणि कुशलच्या बाबांचं निधन झालं. या दुर्दैवी घटनेनंतर कुशलने मुंडन केल्याने पुढे चित्रपटाच्या शुटसाठी अडचण आल्या खऱ्या पण त्याने तो चित्रपट पुर्ण केला.
 

kushal  
 
त्यानंतर 'जत्रा' प्रदर्शित झाल्यानंतर स्क्रीनींगच्या वेळी कुशल आईला घेऊन आला होता. सिनेमाच्या इंटर्व्हलला कुशलने मागे वळून पाहिलं तर त्याची आई त्याच्या बाबांचा फोटो घेऊन चित्रपट पाहात होती. ही आठवण सांगताना कुशलच्या डोळ्यात पाणी आलं. "जत्रा चित्रपटाने आम्हा सर्वांना घडवलं. आज त्या चित्रपटातलाला प्रत्येकजण मराठीतला सुपरस्टार आहे", असं देखील यावेळी कुशल म्हणाला.