हिंदू देवी देवतांची आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणाऱ्या 'अब्दुल रशीद'वर गुन्हा दाखल

    14-May-2024
Total Views |
 Hindu Gods
 
मुंबई : सोशल मीडियावर हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अब्दुल रशीद अब्दुल लतीफ असे आरोपीचे नाव आहे. अब्दुलने इंस्टाग्रामवर 'लॉस्ट बॅक' नावाचे एक हँडल तयार केले असून त्याद्वारे तो सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहे. गुरुवार, दि.९ मे २०२४ पोलिसांनी अब्दुलविरुद्ध एफआयआर दाखल करून तपास सुरू केला.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण मुंबईतील नवघर पोलिस स्टेशनचे आहे. याप्रकरणी एका २४ वर्षीय तरुणाने गुरुवारी येथे फिर्याद दिली आहे. तरुणाने तक्रारीत म्हटले आहे की, तो व्हिडिओ एडिटर म्हणून काम करतो. या कामादरम्यान त्याला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवावे लागते. ८ मे रोजी, तक्रारदार इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असताना, त्याला अनेक रील्स दिसल्या ज्यामध्ये हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला होता. ज्या हँडलद्वारे देवी-देवतांची संपादित छायाचित्रे सतत शेअर केली जात होती, ते 'लॉस्ट बॅक' नावाचे होते.
 
प्रोफाइल तपासल्यानंतर त्याचा ऑपरेटर अब्दुल रशीद अब्दुल लतीफ असल्याचे उघड झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अब्दुलवर कडक कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अब्दुल रशीद अब्दुल लतीफचे नाव घेऊन एफआयआर दाखल केला आहे. आयपीसीच्या कलम २९५ अ, १५३ अ आणि आयटी ॲक्ट (माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६६ सी आणि ६७) अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदाराने अब्दुलने शेअर केलेल्या काही रीलचे स्क्रीनशॉट पुरावा म्हणून पोलिसांना दिले आहेत.