धीरज वाधवान यांना न्यायालयीन कोठडी!

    14-May-2024
Total Views |
Dheeraj Wadhawan
 
मुंबई: सीबीआयने डीएचएफएलचे संचालक धीरज वाधवान यांना अटक केली आहे. ३४००० कोटींच्या घोटाळा केल्याप्रकरणी ही अटक झाली आहे. सोमवारी सकाळी वाधवा यांना सीबीआयने अटक केली होती मंगळवारी विशेष न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
यापूर्वीही सीबीआयने वाधवान यांना २०२२ साली घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती. कथित येस बँक घोटाळ्या प्रकरणी ही अटक झाली होती.सीबीआयने १७ बँकांच्या कन्सोर्टियमची ३४००० कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी DHFL प्रकरण नोंदवले होते ज्यामुळे ही देशातील सर्वात मोठे बँकिंग कर्ज फसवणूक प्रकरण उघडकीस आले होते.
 
केलेल्या कारवाईत सेबीने डीएचएफएलचे माजी प्रमोटर धीरज व कपिल वाधवान यांचे समभाग खाते, बँक खाते व म्युच्युअल फंड खाते हस्तगत करत वाधवान यांच्याकडून २२ लाखांची वसूली केली होती. मात्र मागच्या जुलै महिन्यातील दंड न चुकता केल्याप्रकरणी ही नवी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांनी कथित माहिती उघडकीस न आणल्याने त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या दंडामध्ये सुरुवातीचा दंड, व्याज, व वसूली खर्च या रकमेचा समावेश आहे.
 
धीरज वाधवान यांनी वैद्यकीय कारणासाठी जामीन मागितला होता. परंतु सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर वाधवान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सध्या दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. न्यायाधीश ज्योती सिंह यांनी सीबीआयला नोटीस बजावली असून या संदर्भात उत्तर देण्यास कळवले आहे. या संदर्भात पुढील तारीख न्यायालयाने १७ मे दिली आहे.