मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार, चाहत्यांनाही केलं आवाहन

    13-May-2024
Total Views |

loksabha  
 
 
पुणे : आज १३ मे रोजी देशभरात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2024) चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही ठिकाणी आज मतदान होत असून मराठी कलाविश्वातील कलाकारांनी मतदानाचा हक्क आपल्या कुटुंबासमवेत बजावला (Loksabha Elections 2024) असून नागरिकांनाही मतदानाचे महत्व पटवून देत मत करण्याचे आवाहन केले आहे.
 
अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर हिने मतदानाचा हक्क बजावला आहे. तिने फोटो शेअर करत, “सर्वोच्च प्राधान्य. प्रत्येक मत महत्त्वाचे! मतदान करा. तुमचे मत महत्त्वाचे आहे”, असे लिहिले आहे.
 

arya  
 
सोनाली कुलकर्णीने आई वडिलांसोबत मतदान केले आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, “चेहरा अभिमानाचा आहे! माझी जबाबदारी पार पाडल्याचा मला अभिमान आहे. तुम्ही मतदान केले का? कर्तव्य आणि अधिकार - नाण्याच्या दोन बाजू. कर्तव्य पार पाडल्या शिवाय अधिकार मिळत नाही. लक्षात असूद्या. मतदान करा”.
 
 sonali  
 
अभिनेत्री नेहा महाजनने देखील मतदान केले असून फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, “कृपया मतदान करा. लोकशाही जिवंत ठेवा”.
 

neha  
  
अभिनेत्री श्रृती मराठेने आई वडिलांसोबत मतदानाचा हक्क बजावला असून तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हटले की, “मी केले. तुम्ही मतदान केले का?”.
 shruti  
 
गायत्री दातारने मतदान केल्यानंतर पोस्ट करत लिहिले आहे की, “मतदान करणे हा आपला हक्कच नाही तर आपल्या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य देखील आहे! मी तुम्हा सर्वांना विनंती करते की तुम्ही तुमचे मत द्या आणि आपल्या देशाला उद्याच्या चांगल्या आणि उज्वल दिशेने वाटचाल करण्यास मदत करा!”.
 gayatri  
 
 
अभिनेत्री उर्मिला निंबाळकरनेही मतदान केले असून, “आपल्या हातात काय आहे?” या सतत पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे “मतदान”! सारासार विचार करुन, तटस्थपणे आपण चुकीचे इन्फ्लुयन्स तर होत नाही ना याची खातरजमा करत, निष्कर्षाला पोहोचले आणि माझा अधिकार आणि कर्तव्य पार पाडून आले”, अशो पोस्ट तिने केली आहे.
 

urmila