आंबा - उन्हाळी मेवा

    13-May-2024
Total Views |
 Mango


सिझनल फळांचा विचार केला, तर ‘फळांचा राजा’ म्हणून ज्याला ओळखले जाते, त्या आंब्याबद्दल, त्याच्या विविध औषधी गुणधर्मांबद्दल आज आपण जाणून घेऊया.
 
ऋतुसापेक्ष आहारात व विहारात बदल करावा, असे आयुर्वेदशास्त्र सांगते. याचाच अर्थ, ज्या-ज्या ऋतूंमध्ये जे-जे तयार होते, त्याचा वापर त्या ऋतपुरता असावा, तेव्हाच त्याचे फायदे मिळतात. सीझननुसार उपलब्ध होणारी फळे ही या नियमानुसार त्या-त्या ऋतूमध्येच खावीत. हल्ली केळी आणि सफरचंद १२ महिने मोठ्या शहरांतून उपलब्ध होतात. जरी ती उपलब्ध होत असली, तरी त्यांचे पीक विशेषतः सफरचंद हे फळ १२ महिने फळत नाही. कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून किंवा अन्य देशांतील फळे निर्यात करून ही बाजारात येतात. अशी फळे शरीरात १०० टक्के सात्म्य होतील, सूट होतील, असे नाही.आंब्याच्या खूप जाती-प्रजाती भारताच्या विविध विभागांतून तयार होतात. ५००-१००० इतक्या प्रकारच्या प्रजाती असू शकतात. यातील ३५० प्रजाती जगभरातून विविध प्रांतांमध्ये व्यावसायिकदृष्ट्या वाढविल्या जातात, उगवल्या जातात.
 
आंब्यांमध्ये देवगड हापूस जसा फळांचा राजा म्हणून सर्वात अधिक प्रसिद्ध आहे, तसेच जुनागढ येथील केसर आंबा प्रजाती हिला ‘आंब्यांची राणी’ मानले जाते. लंगडा, तोतापुरी, रायवळ, चौसा, नीलम, बंगनपल्ली, हिमसागर, दशेरी, बादामी, पायरी, सफेदा इ. प्रजाती भारतामध्ये विविध प्रांतांमध्ये पिकतात, जरी हे प्रकार आंब्यांचा राजा किंवा राणी नसले तरी हायब्रिड फळे १२ महिने मिळू लागली आहेत.आयुर्वेदामध्ये आंब्याचे अनेक गुणधर्म सांगितले आहेत. तसेच औषधी उपयोगही सांगितले आहेत. त्याबद्दल थोडे जाणून घेऊयात. आयुर्वेदात केवळ कच्चे फळ कैरी व पिकलेले फळ आंबा एवढेच न सांगता, त्याच्या कोयीचा, पानांचा, सालीचा आणि मोहोराचाही उपयोग सांगितला आहे.

आंबा उष्ण प्रदेशात अधिक होतो. रानात- डोंगरात झाडे न लावता, स्वत: उगवतात ते रायवळ आंबे होत. बागायतीत उंचीचे आंबे म्हणजे दरसाला आणि कलम करून तयार केलेले झाड म्हणजे कलमी आंबे-ही झाडे लहान असतात. कलमी आंब्यांपेक्षा गावठी आंब्यांचे औषधात उपयोग अधिक आहे. आंब्यातील रस पातळसर असल्यास, तो रसाळ आणि व कापून खाण्यास योग्य आणि ज्याचा रस दाट त्या आंब्याला ‘कापा आंबा’ म्हणतात. आंबा सहसा वर्षातून एकदाच एका झाडाला लागतो. आंब्याचे दैनंदिन जीवनातील काही उपयोग खालीलप्रमाणे आहेत. कैरी सोलून, कापून वाळवावी. याला ‘आंबांशी’ म्हणतात. चिंचेऐवजी स्वयंपाकात ‘आंबांशी’ वापरल्यास ती अधिक पथ्यकर ठरते आणि चवीमध्ये उत्तम लागते.कैरीपासून गूळ किंवा साखर घालून पन्हे तयार केले जाते. उन्हाळ्यात वारंवार तहान लागते. ती केवळ पाणी प्यायल्याने शमत नाही. आंबट-गोड चवीने तहान भागते, शमते आणि तरारी येते. म्हणूनच, उन्हाळ्यात कोकम सरबत आणि पन्हे प्यावे.

 कोल्ड्रिंक्स, फळांच्या रसापेक्षा वरील सरबते अधिक परिणामकारक आहेत. पाडाच्या आंब्यापासून मुरंबा केला जातो, याची चव तर उत्तम लागतेच, पण याने रक्तवाढीलाही मदत होते. कैरीतही गूळ घालून गुळांबा केला जातो. उन्हाळ्यात तिखट-चमचमीत खाल्ल्यास उष्णतेचे त्रास होऊ शकतात. उन्हामुळे भूक लागत नाही. पण, गुळांबा-पोळी असे खाल्ल्याने तोंडाला चवही येते, जेवणही जेवले जाते आणि तृप्ती-समाधान मिळते. आंब्यांचा कोयी/बाठी वाळवून आतील गर काढून घ्यावा. ही आतील कोय भाजून नुसतीही खाल्ली जाते किंवा त्याचे पीठ केले जाते. या पिठाच्या पापड्या व धिरडीसाठी उपयोग होतो. या गराच्या पिठाच्या भाकर्‍याही केल्या जातात. आंब्याला चिक असतो, त्या गोंदाला ‘राळ’ म्हणतात. तसेच कोयीतून तेल निघते, या दोन्हीही गोष्टी औषधी असतात.हल्ली बर्‍याचदा एक प्रश्न वारंवार विचारला जातो. डायबिटीसमध्ये आंबा खावा का? त्याबद्दल थोडे जाणून घेऊया.

आंबा (पिकलेला)जड असतो. त्यामध्ये सरासरी १०० ग्रॅमला १४ गॅ्रम साखर असते. प्रत्येक फळात व धान्यांमधून साखर (छअढणठअङ डणॠअठड) असतातच. ज्यांची डायबिटीसमुळे इङजजऊ डणॠअठ अत्यंत जास्त आहे किंवा सारखी बदलते किंवा कलअखउ खूप जास्त आहे. डायबिटीसमुळे अन्य आरोग्याच्या समस्याही आहेत. अशांनी आंबा टाळावा. इजठऊएठ ङखछए ऊखअइएढएड असलेल्यांनी बेताने आंबा खावा. (आडवा हात मारू नये) नियंत्रणात सेवन केल्यास आंबा अधूनमधून खावा. पण, आंबा/आंब्याची फोड अशा स्वरूपात खावी. आमरस आंबा आणि क्रीम, आंबा मिल्सशेक व तत्सम जिन्नस घेऊ नयेत. याचे कारण अन्य घटक द्रव्यांतील साखर आणि ही पाककृती तयार करायला लागणारी साखर यांचे प्रमाण अधिक असल्याने हे पदार्थ सेवन केल्यास स्वाभाविक साखरेची मात्रा वाढणार. हे टाळण्यासाठी पिकलेला आंबा फोडी करून खावा. दिवसा खावा आणि अन्य गोड पदार्थ किंवा पचायला जड पदार्थांचे सेवन टाळावे.
 
पिकलेल्या आंब्यात साखर असल्याने शौचास साफ होते. ज्यांना अतिसाराचा, जुलाबाचा त्रास होतो, त्यांनी आंबा टाळावा. आंबा स्नेहन व अनुलोमनचे कार्य करतो. पिकलेला आंबा विविध वात-पित्तजन्य विकारांमध्ये उपयोगी आहे. आंब्यातील स्नेहांशामुळे कोष्ठातील रूसनेमध्ये व कॉन्स्टिपेशनमध्ये आंबा उपयोगी ठरतो. आंब्याने शरीरातील रक्तअल्पता भरून येण्यास मदत होते. तसेच रक्तपित्त या रोगातही आराम देण्यास वापरले जाते. हृदयस्पंदने योग्य गतीत नियमित करून हृदयाच्या पेशींचे आकुंचन-प्रसरण योग्य स्वरूपात होण्यासही आंब्याचा उपयोग होतो. छातीत धडधड अनामिक असल्यासही आंबा खावा. विविध हृदयरोगांमध्ये आंबा पथ्यकर आहे. पिकलेला आंबा वर्ज्य असल्याने शुक्र दौबल्यामध्ये अवश्य खावा. अन्य औषधी चिकित्सेबरोबर आंबासेवन करावे. याचबरोबर आंबा ताकद देणारा, थकवा दूर करणाराही आहे. त्वचेच्या विकारांवर आंबा उपयोगी आहे. आंब्याची आतील साल त्वचेवर चोळल्यास ‘स्क्रीन ब्रायटिनिंग इफेक्ट’ येतो. तसेच ‘अ‍ॅण्टी टॅनिंग इफेक्ट’ही मिळतो.
 
बर्‍याचदा वाढत्या वयातील मुला-मुलींमध्ये वजन वाढत नाही, असे दिसून येते. खाल्ले तरी अंगाला लागत नाही. कुठे जाते कळत नाही, अशी पालकांची (विशेषतः आईची तक्रार असते.) अशा वेळेस, रोज उन्हाळ्यामध्ये आंबा खावा किंवा आमरस घ्यावा. याने कृशता कमी होण्यास मदत होते. उंची व जाडी वाढण्यास उपयोगी आहे.उन्हामुळे अंगाची आग-आग होणे, उन्हाळ्यात पोटात आग होणे, जुलाब होणे या त्रासांवर आंब्याची अंतरसाल दह्यात वाटून खावी. या लक्षणांमध्ये आराम पडतो. जर जुलाबावाटे रक्त पडत असेल, तर आंब्याची साल दुधात वाटून मध घालून चाटण्यास द्यावी. रक्त पडणे थांबते व जुलाबही आटोक्यात येतात.उन्हाळ्यात अंगावर घामोळे उठते. संपूर्ण अंगावर घामोळे येऊन अंगावर खाज येते, अंग टोचते. अशा वेळेस आंबा भाजावा, त्याचे साल काढून तो बलक अंगाला लावावा, चोळावा. याने घामोळे बसण्यास मदत होते.

सर्व प्रकारच्या उष्णतेवर आंब्याची अंतरसाल, उंबराच्या मुळावरची साल आणि वडाच्या पारंब्या यांचा वापर करावा. या तिन्ही औषधी द्रव्यांचा रस काढून त्यात जिरे आणि खडीसाखर घालून प्यावे. याने आराम पडतो.उष्माघाताचा त्रास (म्हणजे लघवीला आग होणे) हातापायांची आग होणे, डोळ्यांची आग होणे, घसा कोरडा पडणे, वारंवार तहान लागणे, उलटी होणे, मळमळणे, छातीत धडधडणे, चक्कर येणे व क्वचित बेशुद्ध होणे. उन्हातील घामाच्या अतिरिक्त प्रमाणामुळेही हातापायात पेटके येतात. अशा वेळेस कैरीचे पन्हे प्यावे. ‘कुलिंग इफेक्ट’बरोबरच एनर्जी ड्रिंक्स घ्यावे. तहान शमून उन्हाची काहिली कमी होते. (क्रमशः)

वैद्य कीर्ती देव