Q4 Results: बँक ऑफ बडोदा तिमाही निकाल बँकेला ४८८६ कोटींचा निव्वळ नफा

संचालक मंडळाने प्रत्येक समभागावर ७.४० रुपयांचा लाभांश सुचवला

    13-May-2024
Total Views |

bank of baroda
 
 
मुंबई: बँक ऑफ बडोदाने तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर तिमाहीतील नफ्यात २.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत बँकेला ४८८६ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या ऑपरेटिंग खर्चात वाढ झाल्याने ' बॉटम लाईन' मध्ये घट झाली असली तरी बँकेच्या दुसऱ्या उत्पन्नात २०.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income) मध्ये २.३ टक्क्यांनी वाढ होत उत्पन्न ११९७२ कोटींवर पोहोचले. मात्र निव्वळ व्याज मार्जिनमध्ये ३.२६ टक्क्यांवर पोहोचले आहे. बँकेचा एनपीए (Non Performing Assets) ०.८९ टक्क्यावरून ०.६८ टक्क्यांवर घट झाली आहे.
 
बँकेच्या मुदत ठेवीत ७.७ टक्क्यांनी वाढ होत चौथ्या तिमाहीत ११.२८ लाख कोटीवर पोहोचले आहे. बँकेच्या किरकोळ अँडव्हान्समध्ये मागील वर्षाच्या तुलनेत २०.७ टक्क्यांनी वाढ होत २.१४ लाख कोटींवर पोहोचले आहे. बँकेच्या संचालक मंडळाने प्रति समभाग ७.६० रुपयांचा लाभांश (Dividend) सुचवला आहे आगामी भागभांडवल धारकांच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होणार आहे.