“पुन्हा नरेंद्र मोदीचं निवडून येतील”, श्रेयस तळपदेने व्यक्त केला विश्वास

    13-May-2024
Total Views |

modi  
 
 
मुंबई : मराठीसह हिंदीतही आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच एक नवी कलाकृती घेऊन समोर येणार आहेत. श्रेयस त्याच्या आगामी 'कर्तम् भुगतम्' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपुर्वी तो महेश मांजरेकर दिग्दर्शित ही अनोखी गाठ या चित्रपटात झळकला होता. सध्या देशात लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु असून श्रेयसने सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. “एकूणच सध्याचं वातावरण पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा निवडून येतील अशी चिन्हं आहेत”, असं तो म्हणाला आहे.
 
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस म्हणाला की, “सध्याच्या राजकारणाकडे बघायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मला कौतुक आहे. गेली १० वर्ष मोदीजी देशाचं काम करत आहेत. ते आधी देशाचा विचार करतात. अटलबिहारी वाजपेयी सुद्धा असेच होते. जनतेचा कौल नरेंद्र मोदीजी यांच्याकडे आहे. त्यामुळे एकूणच सध्याचं वातावरण पाहता नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील, अशी चिन्हं आहेत."
 
दरम्यान, श्रेयसच्या भविष्यातील चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास 'कर्तम् भुगतम्' , ‘इर्मजन्सी’, ‘कापकपी’, ‘वेलकम’, ‘टु जंगल’ या चित्रपटांमध्ये लवकरच तो झळकणार आहे.