मुंबईत पेट्रोल पंपावर होर्डींग कोसळले! अनेकजण दबल्याची भीती

    13-May-2024
Total Views |
 
Mumbai hoarding
 
मुंबई : मुंबईमध्ये सोमवारी अचानक अवकाळी पाऊस सुरु झाला. दरम्यान, घाटकोपर भागात पेट्रोल पंपावर होर्डींग कोसळले असून त्याखाली अनेकजण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
 
 
मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डींग कोसळले आहे. या होर्डींगखाली अनेकजण अडकले असल्याची माहिती पुढे आली आहे. घटनास्थळी बचावपथक दाखल झाले असून बचावकार्य सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
याशिवार वडाळा भागातही मोठे होर्डींग कोसळल्याचे बोलले जात आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. घटनास्थळी बचावपथक दाखल झाले आहे. मदतकार्य सुरु आहे. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईमध्ये पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान मुंबईतील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाऊस पडण्यापुर्वी धुळीचे मोठे लोट अनेक ठीकाणी पहायला मिळाले. दादर मधील श्री जी टाॅवरजवळीही होर्डींग कोसळले. त्याचा विडीयोही सोशल मिडीयावर वायरल झाला आहे. अनेक ठीकाणाहुन धुळीच्या वादळाचे, पावसाचे, आणि होर्डींग, झाडे कोसळण्याचे विडीयो वायरल होत आहेत.