लोकसभा निवडणूक : सकाळी ९ पर्यंत किती टक्के मतदान? वाचा सविस्तर...

    13-May-2024
Total Views |

Voting 
 
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवार, १३ मे रोजी होत आहे. चौथ्या टप्प्यात एकूण ११ मतदारसंघात मतदान होणार असून सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या मतदारसंघांमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले आहे.
 
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
 
जळगाव - ६.१४ टक्के
 
जालना - ६.८८ टक्के
 
नंदुरबार - ८.४३ टक्के
 
शिरूर - ४.९७ टक्के
 
अहमदनगर - ५.१३ टक्के
 
औरंगाबाद - ७.५२ टक्के
 
बीड - ६.७२ टक्के
 
मावळ - ५.३८ टक्के
 
पुणे - ६.६१ टक्के
 
रावेर - ७.१४ टक्के
 
शिर्डी - ६.८३ टक्के