मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दरात घट

भाजी, अन्नधान्यातील महागाईतील अनिश्चितता कायम

    13-May-2024
Total Views |

Retail Inflation
 
मुंबई: सरकारने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाई दर एप्रिल महिन्यामध्ये ४.८३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) दरात मार्च महिन्यातील ४.८ टक्क्यांवरून घटत ४.७ टक्क्यांवर महागाई दर पोहोचला आहे.
 
अन्नातील महागाई दरात एप्रिलमध्ये मात्र मार्च महिन्यातील ८.५२ टक्क्यांनी वाढत ८.७० टक्क्यांवर महागाई दर पोहोचले आहे. सरकारने रिझर्व्ह बँकेला महागाई दर २ ते ४ टक्यांच्या दरम्यान राहतील अशी उपाययोजना करण्याचे सुचवले होते.इतर महागाई दर मर्यादेत राहिले असले तरी अन्नधान्याच्या किमतीतील अनिश्चिततेमुळे अन्न महागाई नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान आरबीआयसमोर आहे.
 
रिझव्र्ह बँकेच्या मते, द्वैमासिक पतधोरणात येताना ग्राहक चलनवाढीत कोणते घटक आहेत, खाद्यपदार्थांच्या किमतीतील अनिश्चितता यापुढेही चलनवाढीच्या मार्गावर तोलत राहतील.