‘बिग बॉस ओटीटी- ३’ मध्ये सलमान खानऐवजी संजय दत्त दिसणार?

    13-May-2024
Total Views |
big boss  
 
मुंबई : बिग बॉस आणि सलमान खान (Big Boss OTT Season 3) हे समीकरण पक्कं आहे. पण बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनमुळे एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. सलमान खान बिग बॉस ओटीटीच्या या तिसऱ्या सीझनचे सुत्रसंचलन करणार नसल्याचे सांगितले जात असून त्याची जागा अभिनेता संजय दत्त घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
 
पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस ओटीटी सीजन-३ च्या निर्मात्यांनी संजय दत्त, अनिल कपूर व करण जोहर कलाकारांशी संपर्क साधला असून सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सलमान त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुट मध्ये व्यस्त असल्याकारणाने तो या शोचा भाग कदाचित होई शकणार नाही.
 
त्यामुळे जर का सलमान खानला खरंच जमलं नाही तर त्याच्या ऐवजी निर्मात्यांनी आधीच संजय दत्त, अनिल कपूर व करण जोहरला शो होस्ट करण्यासाठी संपर्क साधला आहे.
 
सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट २०२५ मध्ये भेटीला येणार असून या चित्रटात साऊथ स्टार रश्मिका मंदाना झळकणार आहे.तसेच, दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास व सलमान या चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्रित काम करणार आहेत.