बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यात्रेकरूंसाठी झाले उघडे

    13-May-2024
Total Views |

Badrinath

मुंबई (प्रतिनिधी) :
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील प्रसिद्ध बद्रीनाथ (Badrinath) मंदिराचे दरवाजे रविवार, दि.१२ मे रोजी सकाळी ६ वाजता उघडले, ज्यामुळे भाविकांना पारंपरिक पद्धतीनुसार दर्शन घेता आले. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मंदिर झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते.

हे वाचलंत का? : काठमांडू खोऱ्यात महालक्ष्मी जत्रेला सुरुवात

भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी प्रशासकीय स्तरावर व्यापक व्यवस्था सध्या करण्यात आली आहे. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर आता उत्तराखंडमधील चारही धाम भाविकांसाठी खुले झाले आहेत. यापूर्वी केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिरांचे दरवाजे १० मे रोजी उघडण्यात आले होते.