अदानी समुह या आर्थिक वर्षात ८०००० कोटींची गुंतवणूक करणार

नवउर्जा व व विमानतळ व्यवसायात भांडवली खर्च करणार

    13-May-2024
Total Views |

Adani
 
 
मुंबई: या आर्थिक वर्षात अदानी एंटरप्राईज ८०००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्राईज समुहाने या आर्थिक वर्षात, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत नवऊर्जा, विमानतळ या व्यवसायावर आधारित ही गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे.अदानी समुहाचे मुख्य आर्थिक अधिकारी सौरभ शहा यांनी ' आगामी वर्षात कंपनी ८०००० कोटींची भांडवली गुंतवणूक (Capex) करणार असल्याचे सांगितले आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (ANIL) व विमानतळ व्यवसायात ५००० कोटींची गुंतवणूक समुह करणार आहे ' असे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
 
अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी मुख्यतः सौर ऊर्जा मोड्युल बनवण्याचे काम करते. सूर्यकिरणांच्यामार्फत यातून उर्जा बनवण्याचे काम करणे तसेच या सूर्यकिरणामार्फत ग्रीन हायड्रोजन देखील बनवण्यात येतो. याशिवाय शहा यांनी माहिती दिल्याप्रमाणे, गंगा एक्स्प्रेसवे प्रकल्पावर वर १२००० कोटींचा भांडवली खर्च करण्यात येणार असून राहिलेला निधी इतर व्यवसायावर खर्च करण्यात येणार आहे.
 
याविषयी प्रतिक्रिया देताना,'कारण आम्ही आमचा पीव्हीसी प्रकल्प देखील सुरू करत आहोत, पीव्हीसी व्यवसायात सुमारे १०००० कोटींचे भांडवल असेल, तर उर्वरित डेटा सेंटरमध्ये सुमारे ५००० कोटी असेल.'शाह म्हणाले की सौर मॉड्यूल्स तसेच 3 GW विंड टर्बाइनचे व ANIL१० गिगावॅट उत्पादन करण्यासाठी कारखान्यांना लक्ष्य करीत आहे'
 
याशिवाय, FY26 साठी, इतर कॅपेक्स आमच्या ग्रीन हायड्रोजन व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या प्रारंभिक गरजांसाठी असेल, जे आमच्या ग्रीन हायड्रोजन तसेच डाउनस्ट्रीम उत्पादनांसाठी किकस्टार्ट म्हणून असेल," असे शहा पुढे म्हणाले आहेत.
 
याव्यतिरिक्त गुजरात खावडा येथे अदानी समुहाने सौर ऊर्जा सेल व मोड्युल बनवण्यासाठी उपयुक्त ठरणारा वेफर व इंगोटचे उत्पादन यापूर्वीच सुरु केले आहे. २०२७-२८ पर्यंत भारताला आघाडीचा नवं ऊर्जा उत्पादक बनवण्यासाठी कंपनीने पोलिसिलिकॉन (Polysilicon) बनवण्याचे देखील ठरवले आहे. कंपनीने ४५ गिगावॉट क्षमतेची नवउर्जा आर्थिक वर्ष २०३० पर्यंत निर्माण करण्याचे लक्ष ठरवले होते. यामधील मोठा हिस्सा खावडा गुजरात येथे तयार केला जाणार आहे.
 
अदानी समुहाचे देशात ७ विमानतळ आहेत. आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत अदानी समुहाने नवी मुंबई ग्रीन फिल्ड विमानतळ बांधण्याचे लक्ष ठेवले आहे. कंपनीच्या माहितीनुसार हे २०२५ मध्ये कार्यरत होऊ शकते.