ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी कालवश; रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास

    13-May-2024
Total Views |

satish joshi  
 
मुंबई : मालिका, चित्रपट आणि नाट्यविश्वातील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी (Satish Joshi) यांचे १२ मे २०२४ रोजी निधन झाले. सतीश यांनी रंगोत्सवात व्यासपीठावर त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी दिली. सतीश जोशी यांच्या (Satish Joshi) निधनावर मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.
 
सतीश यांच्या निधनाबद्दल माहिती देत राजेश देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर लिहिले होते की, “आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले. ओम शांती ओम.”
 
सतीश जोशी यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये महत्वपुर्ण भूमिका साकारल्या होत्या. झी मराठी वाहिनीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतील त्यांची भूमिका विशेश गाजली होती. याशिवाय ‘यशोदा गोष्ट श्यामच्या आईची’ ही मालिका त्यांच्या अभिनयाची शेवटची कलाकृती ठरली होती.
 
आजवर अनेक कलाकारांनी रंगभूमीवरच अखेरचा श्वास घेतला. सच्च्या कलाकाराची नाळ आपल्या कलेशी घट्ट जोडलेली असते. सतीश जोशी यांनाही रंभूमीवरच देवाज्ञा झाली. ‘सृजन द क्रिएशन’ या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सुरु असलेल्या कार्यक्रमादरम्यान सतीश यांनी अखेरचा श्वास घेतला.