आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत : संजय राऊत

    12-May-2024
Total Views |

Sanjay Raut 
 
नाशिक : आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असं वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होत.
 
संजय राऊत म्हणाले की, "भाजप हा चांगल्या माणसांचा पक्ष नाही. तर ही भ्रष्टाचाऱ्यांची आणि गुंडांची टोळी आहे. गुंडसुद्धा अनेकदा समोरून वार करतो. गुंडगिरीला एक नीतीमत्ता असते. देवेंद्र फडणवीससारखे लोकं आमच्यासमोर काय गुंडगिरी करणार? आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रात या आम्ही ४ जूननंतर गुंडगिरी काय असते ते दाखवतो."
 
हे वाचलंत का? -  "ते कदाचित डायलॉगबाजी करु शकतात पण..."; दरेकरांचा अमोल कोल्हेंना टोला
 
"बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना आम्ही रस्त्यावर दगड उचलून आणि प्रसंगी हातात हत्यारे घेऊन स्थापन केली आहे. आमचा एक हात मृत्यूच्या खांद्यावर आणि दुसरा हात बंदुकीच्या चापावर राहिला आहे. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही तुरुंगात गेलो पण तुमच्यासमोर झुकत नाही," असे ते म्हणाले.