"उद्धव ठाकरेंची मुलाखत रोखठोक नाही तर पोलखोल!"

    12-May-2024
Total Views |
 
Thackeray
 
मुंबई : उद्धव ठाकरेंची मुलाखत रोखठोक नाही तर पोलखोल झाली आहे, अशी टीका भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. संजय राऊत यांनी सामनाकरिता ठाकरेंची मुलाखत घेतली होती. यावर प्रसाद लाड यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना टीका केली.
 
प्रसाद लाड म्हणाले की, "उद्धव ठाकरेंची मुलाखत रोखठोक नाही तर पोलखोल मुलाखत आहे.उद्धव ठाकरे म्हणतात की, मोदींना मी पंतप्रधान केलं, पण मुळात तुमचे आमदार आणि खासदारच मोदीजींच्या चेहरा आणि नावामुळे निवडून आलेत. त्यामुळे त्यांना मी पंतप्रधान केलं असं म्हणण्याचा ठाकरेंना नैतिक अधिकार नाही."
 
हे वाचलंत का? -  शरद पवारांनी कृषीमंत्री असताना ठाणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी काय केलं?
 
"महाराष्ट्राच्या लोकांनी मोदीजींना पंतप्रधान केलं. यात उद्धव ठाकरेंचं शुन्य योगदान आहे. उद्धव ठाकरे सध्या बिथरले आणि सटकले आहेत. ते मानसिक रुग्ण झालेत. त्यामुळे ते काय बोलतात यावर त्यांचं तारतम्य राहिलेलं नाही," असा घणाघातही प्रसाद लाड यांनी केला आहे.