"कुठं अस्सल खणखणीत नाणं आणि कुठं तुम्हा नकलींचा..."; चित्राताई कडाडल्या

    12-May-2024
Total Views |
 
Raut & Chitra Wagh
 
मुंबई : कुठं देवेंद्रजींसारखं अस्सल खणखणीत नाणं आणि कुठं तुम्हा नकलींचा कमअस्सल खोटा शिक्का, असा टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना लगावला आहे. संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत राऊतांवर निशाणा साधला.
 
 
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "टीनटप्पर सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्र फडणवीस काय आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. देवेंद्रजी राजकारणाच्या विद्यापीठातलं अस्सल मेरिट मटेरियल आहेत. तुम्ही आणि तुमचे उद्धव ठाकरे मात्र वकुब नसलेले टमरेल आहात. त्यामुळे ४ जूनला तुम्ही जनतेकडून सणसणीतपणे लाथाडले जाणार आहात," असे त्या म्हणाल्या.
 
हे वाचलंत का? -  "उद्धव ठाकरेंची मुलाखत रोखठोक नाही तर पोलखोल!"
 
त्या पुढे म्हणाल्या की, "कुठं देवेंद्रजींसारखं अस्सल खणखणीत नाणं आणि कुठे तुम्हा नकलींचा कमअस्सल खोटा शिक्का? देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही. जनतेची नाडी व्यवस्थित समजणारे ते निष्णात डॅाक्टर आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे सल्ले उद्धवजींसाठी जपून ठेवा. आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीची भाषा वापराल तर त्याचं भाषेत ठोक उत्तर तुम्हाला देऊ हे लक्षात ठेवा," असेही त्या म्हणाल्या.