"ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच! हिंमत असेल तर 'या' पाच प्रश्नांची उत्तरं द्या"

चंद्रशेखर बावनकुळेंचे ठाकरेंना आव्हान

    12-May-2024
Total Views |
 
Thackeray & Raut
 
मुंबई : उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच आहे. हिंमत असेल तर माझ्या पाच प्रश्नांची उत्तरं द्या, असे थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंना दिले आहे. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची सामना वृत्तपत्रासाठी मुलाखत घेतली होती. त्यानंतर बावनकुळेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरेंवर निशाणा साधला.
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच आहे. पण उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत," असे ते म्हणाले.
 
 
 
चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना विचारलेले पाच प्रश्न पुढीलप्रमाणे :
 
१. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?
 
२. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?
 
३. सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?
 
४. राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?
 
५. उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता? 
 
असे प्रश्न बावनकुळेंनी ठाकरेंना विचारले आहेत. तसेच हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन उद्धव ठाकरेंनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे, असे जाहीर आव्हानच चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.