अयोध्या धाम येथे हिंदी गीतरामायण

    11-May-2024
Total Views |

geet ramayan 
मुंबई : विश्व हिंदू परिषद अयोध्या महानगर आयोजित गीत रामायण की भारत गौरव यात्रा रविवार दि. 12 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता श्रीराम ऑडिटोरियम न्यू बस स्टॅन्ड जवळ अयोध्या धाम येथे होणार आहे. चित्रा देशपांडे तसेच सुखदा खांडेकर यांच्या आकार प्रस्तुत बाल और सखी गीत रामायण हिंदी चे सादरीकरण सुद्धा यावेळी होईल. आधुनिक वाल्मिकी ग दि माडगूळकर आणि स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे संगीत आकार के 50 कलाकार ही संस्था प्रस्तुत करत आहे. सर्व रसिकांनी या समारोहास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन पुणे येथील बालविभाग संस्कार भारतीच्या चित्रा देशपांडे यांनी केले आहे.