सिंगापूरचे पंतप्रधान म्हणाले,'आयआयटी आयआय एम भारतातील सर्वोत्तम संस्था ' त्यांचे सिंगापूरसाठी….

त्यांनी आयआयएम व आयआयटी माजी विद्यार्थ्यांना संबोधित केले

    11-May-2024
Total Views |

Singapore PM
 
 
 
मुंबई: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) व Indian Institute of Management (IIM) या दोन महत्वपूर्ण संस्था असून यातून होणारे पदवीधर सिंगापूरसाठी महत्वाचे मानव संसाधन आहे' असे प्रतिपादन सिंगापूरचे पंतप्रधान ली हँसीएन लुंग यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.सिंगापूरसाठी या संस्थेच्या पदवीधरांचा ' टॅलेंट पूल' आहे व यांचे सिंगापूरच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान आहे असे महत्वपूर्ण विधान त्यांनी केले.
 
यावेळी बोलताना त्यांनी या दोन्ही संस्थेच्या उच्च दर्जाविषयी भाष्य करत आगामी पदवीधर हे सिंगापूरमध्ये महत्वाचे मानवी संसाधन ठरेल असे म्हटले आहे. सिंगापूरमधील मानवी संसाधनाची गरज असताना कामाची पूर्तता करण्यात विदेशी संसाधन महत्वाचा हातभार लावेल असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले आहे.
 
आयआयएम, आयआयटी या भारतातील महत्वाच्या संस्था असून इतर संस्थांच्या तुलनेत प्राधान्य देत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे. या शैक्षणिक संस्थांच्चे माजी विद्यार्थी वेळोवळी सिंगापूर येथे एकत्र येत त्यांनी एक संस्था सिंगापूर येथे बनवली होती आणि वेळोवेळी या संघटनेचे कार्यक्रम सिंगापूर येथे होत असतात याचं कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संबोधित करत पंतप्रधान यांनी वरील उद्गार काढले आहेत.
 
यामध्ये बोलताना त्यांनी 'मला असा चांगल्या दर्जाचे मानव संसाधन मिळणार असेल इथे या आणि काम करा ' असे सन्मानजनक उद्गार त्यांनी काढले. परदेशी तरूणांचा ओढा सिंगापूरमध्ये येत असताना हे स्थलांतर कमी नसल्याचा दावा ली यांनी केला आहे.
 
'आम्ही त्यांचा सन्मान करू हे संसाधन सिंगापूरसाठी महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मुख्यतः सिंगापूर येथे जागतिक पातळीवरील नागरिक नोकरी व्यवसायासाठी येत असतात विशेषतः चीन, भारत, बांगलादेश, श्रीलंका, व दक्षिण आशिया राष्ट्रातील नागरिकांची मोठी संख्या आहे.
 
मुलाखतीत, ते म्हणाले ,की सामाजिक एकसंधता हवी आहे आणि स्थलांतरितांना आणणे यामधील "निहित तणाव" व्यवस्थापित करणे ही "सर्वात कठीण" समस्या आहे ज्याला त्यांना सामोरे जावे लागले आहे. पुढच्या बुधवारी त्यांचे डेप्युटी लॉरेन्स वोंग यांच्याकडे सोपवण्याआधी ली यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या २० वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेत संपूर्ण मुलाखतीत या विषयावर संबोधित केले होते.
 
'लोकांना आरामदायी, सुरक्षित वाटणे आणि त्यांना धोका न वाटणे किंवा सामाजिक तणाव निर्माण न होणे, ही अशी गोष्ट आहे जी व्यवस्थापित करणे खूप कठीण आहे कारण आमच्याकडे कमी बाजूने युक्ती करण्याची जागा नाही. तुम्ही असे म्हणू शकत नाही की मी (करेन) सर्व परदेशी कामगारांना बंद करा आणि मग उद्या आपण ठीक होऊ."
 
सिंगापूरला जगात दिसण्यासाठी टॅलेंटची गरज आहे, असे ते म्हणाले. "आणि आपल्याकडे कधीही पुरेशी प्रतिभा असू शकत नाही." असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले आहे.