Q4 Results: युनियन बँक ऑफ इंडियाचा तिमाही निकाल, बँकेच्या निव्वळ ६१.८४ टक्क्यांनी वाढ, या तिमाहीत ३१११ कोटी करोत्तर नफा

संचालक मंडळाने प्रत्येक समभागावर ३.६० रुपये लाभांश सुचवला

    11-May-2024
Total Views |

union  bank
 
 
मुंबई: युनियन बँक ऑफ इंडियाने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेला निव्वळ नफ्यात इयर बेसिसवर (YoY) ६१.८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये ११.६१ टक्क्यांनी वाढले आहे. बँकेच्या ठेवीत सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर ८.४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत बँकेची एकूण ठेवींचे मूल्यांकन १२२१५२८ कोटी होते. बँकेच्या एकूण व्यवसायात इयर ऑन इयर बेसिसवर १०.३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
बँकेने दिलेल्या माहितीनुसार,वर्षभरात बँकेच्या व्यवसायात १०.३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.एकूण वर्षात ठेवीत ९.२९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिटेल क्षेत्रात बँकेच्या उत्पन्नात ११.१४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेतकी व्यवसायात बँकेला २०.९५ टक्के वाढ मिळाली आहे तर लघू मध्यम सूक्ष्म (MSME) व्यवसायात ८.५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
बँकेच्या एनपीए (Non Performing Assets) मध्ये ४.७६ टक्क्यांनी घट झाली असून निव्वळ एनपीएत ६७ बेसिस पूर्णांकाने घट होत एकूण घट १.०३ टक्क्यांनी झाली. बँकेच्या करोत्तर नफा (Profit After Tax) मागील आर्थिक वर्षाच्या तिमाहीतील २७८२ कोटींच्या १९ टक्क्यांनी तुलनेत वाढत ३३११ कोटीवर पोहोचला आहे तर मागील तिमाहीत ३५९० कोटींच्या तुलनेत (QoQ) ७.७७ कोटीने घटत ३३११ कोटींवर पोहोचला आहे.
 
बँकेच्या व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात मागील वर्षाच्या २२००५ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत २६३५० कोटींवर पोहोचला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर या उत्पन्नात १९.७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेच्या नेट इंटरेस्ट मार्जिन (NIM) मध्ये मागील वर्षांच्या २.९८ टक्क्यांचा तुलनेत ११ बीपीएसने वाढत ३.०९ टक्क्यांवर पोहोचले आहे. कंपनीचा बँक ऑपरेटिंग नफा (Opeating Profit) मागील वर्षाच्या ६८२३ कोटींच्या तुलनेत ४.२६ टक्क्यांनी घटत ६५३३ कोटीवर पोहोचले आहे.
 
बँकेच्या संचालक मंडळाने प्रति समभाग ३.६० रुपयांचा लाभांश (Dividend) सुचवला असून याबाबतचा अंतिम निर्णय भागभांडवलधारकांच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. बँकेच्या या आर्थिक वर्षांपर्यंत ८४६६ शाखा आहेत तर ८९८२ एटीएम मशीन कार्यरत आहेत.