बिगर लाईफ इन्शुरन्स कंपन्यांच्या प्रिमियम उत्पन्नात १३ टक्क्यांनी वाढ एकूण उत्पन्न २.८९ लाख कोटींवर

जनरल इन्शुरन्स काऊन्सिलने दिलेल्या माहितीत स्पष्ट

    11-May-2024
Total Views |

GI
 
 
मुंबई: लोकांची गरज, मागणी व भविष्याची चिंता यामुळे लोकांचा विमा योजनांकडे वाढत असल्याचे मागील अहवालात दिसून आले होते. नुकत्याच आलेल्या अहवालात, आर्थिक २०२३-२४ मध्ये ४२ सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या (General Insurance Companies) प्रिमियम मधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होत २८९७३८ कोटीवर पोहोचले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे उत्पन्न १३ टक्क्यांनी वाढलेले आहे. संबंधित आकडेवारी जनरल इन्शुरन्स काऊन्सिलने दिलेल्या आकडेवारीत स्पष्ट केले गेले आहे.
 
३५ जनरल इन्शुरन्स कंपन्यापैकी १४ कंपन्याचे प्रिमियममधून आलेले उत्पन्न मागील वर्षाच्या २१४८३३ कोटीवरून वाढत २४५४३३ कोटींवर वाढ झाली आहे. फक्त आरोग्य विमा कंपन्यांच्या प्रिमियम उत्पन्नात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २६ टक्क्यांनी वाढ होत या वर्षी ३३११६ कोटींवर वाढले आहे.
 
सरकारी कंपन्या एग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड व एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या पीएसयु कंपन्यांनी १११८९ कोटींचा प्रिमियम गोळा केला आहे जो मागील वर्षी १५८१७ कोटी ह़ोता. यावर्षीच्या प्रिमियम मध्ये २९ टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे बाजारातील विमा क्षेत्रात निवडणूकीनंतर आणखी वाढ होऊ शकते असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.