पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी उदयनराजे मैदानात!

    11-May-2024
Total Views |

Pankaja Munde & Udayanraje Bhosle 
 
बीड : महायूतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या सभेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली आहे. उदयनराजे भोसले हे बीडमध्ये दाखल झाले असून ते पंकजा मुंडेंच्या सभेला संबोधित करणार आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील पंकजा मुंडेंच्या सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, महायूतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची परळी येथे सांगता सभा होणार आहे. या सभेला साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. पंकजा मुंडेंच्या सभेसाठी ते बीडमध्ये दाखल झाले आहेत.
 
हे वाचलंत का? -  छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा! उबाठा आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने
 
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीसुद्धा बीडमध्ये सभा होणार आहे. यावेळी पंकजा मुंडेंच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनावणे रिंगणात आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे यंदा बीड लोकसभा मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष लागले आहे.
 
दुसरीकडे, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पंकजा मुंडेंचे भाऊ धनंजय मुंडे यांनीसुद्धा पंकजा मुंडेंना पाठिंबा दिला आहे. धनंजय मुंडेंनी शुक्रवारी भर पावसात पंकजाताईंसाठी सभा गाजवली. दरम्यान, यावेळी बीडमध्ये कोण बाजी मारणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.