मेट्रो ३ दादरपर्यंत धावली

मेट्रो ३चा पहिला टप्पा लवकरच सुरु होण्याचा अंदाज

    11-May-2024
Total Views |

metro3


मुंबई, दि.११: प्रतिनिधी 
बहुप्रतीक्षित भूमिगत मुंबई मेट्रो ३ ने मंगळवार, दि.७ रोजी दुपारी मुंबईत प्रवेश केला. कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो 3) मार्गावर दादरपर्यंत ही ट्रेनची चाचणी घेण्यात आली. इतर सर्व बांधकामाधीन कॉरिडॉर उपनगरात आणि मुंबई महानगर प्रदेशात इतरत्र आहेत. मात्र, मेट्रो ३ हा एकमेव कॉरिडॉर आहे जो दक्षिण मुंबईतील प्रवाशांची पूर्तता करेल.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (प्रकल्प) एसके गुप्ता यांनी माध्यमांना सांगितले की, पहिली ट्रेन दुपारी ३ च्या सुमारास दादर मेट्रो स्टेशनवर पोहोचली. काही दिवसांनंतर आम्ही केवळ दादरपर्यंतच नव्हे, तर सिद्धिविनायक मेट्रो स्थानकापर्यंत दक्षिणेकडे वारंवार गाड्या चालवणार आहोत.' वरळी येथील आचार्य अत्रे चौकापर्यंत दुसरा टप्पा सुरू झाल्यावर दादर आणि सिद्धिविनायक स्थानके प्रवाशांसाठी उघडली जाणार आहेत. तर पहिल्या टप्प्यात (आरे-बीकेसी), फेज II (बीकेसी-आचार्य अत्रे चौक) मध्ये सहा स्टेशन आहेत.
एमएमआरसीएलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यानी यापूर्वीच माहिती दिली होती की, आरे आणि बीकेसी स्थानकांदरम्यान चाचण्या सुरू आहेत. परंतु जसजसे काम पुढे जाईल तसे मेट्रो ट्रेन आणखी दक्षिणेकडे नेली जाऊ शकते. पहिला टप्पा सुरु झाल्यावर दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू होतील. पहिला टप्पा एप्रिलमध्ये, दुसरा टप्पा जुलैमध्ये आणि तिसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये सुरू केला जाईल, अशी घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, चाचणी फेऱ्यांमध्ये कामाची गती पाहता असे दिसून येते की, या मुदती चुकण्याची शक्यता आहे. सुरक्षितता प्रमाणपत्र आणि मंजुरी मिळाल्यावर व्यावसायिक ऑपरेशन्स सुरू होतील.